Non Veg Safe During Pregnancy : गर्भधारणेदरम्यान मांसाहार करणे योग्य आहे की नाही? संशोधन काय म्हणते ते जाणून घ्या !

Non Veg Safe During Pregnancy : उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यात गेल्या 10 दिवसांत सुमारे 111 नवजात बालकांचा मृत्यू झाला असून या बालकांच्या मृत्यूचे कारण गर्भवती महिलांच्या दुधात आढळणारे कीटकनाशक आहे. लखनऊच्या क्वीन मेरी हॉस्पिटलच्या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, महाराजगंजमध्ये महिलांच्या दुधात आढळणारी कीटकनाशके या मृत्यूंना कारणीभूत आहेत. आता प्रश्न पडतो की आईच्या दुधापर्यंत कीटकनाशके कशी पोहोचली?

या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी रुग्णालयाने काही गर्भवती महिलांची चाचणी केली. या अभ्यासात 130 शाकाहारी आणि मांसाहारी गर्भवती महिलांचा समावेश करण्यात आला होता. प्रोफेसर सुजाता देव, डॉ. नैना द्विवेदी आणि डॉ. अब्बास अली मेहंदी यांनी हे संशोधन केले आहे.

हा अभ्यास एन्व्हायर्नमेंटल रिसर्च जनरलमध्ये प्रकाशित झाला आहे. या संशोधनात मांसाहार करणाऱ्या महिलांच्या तुलनेत शाकाहारी महिलांच्या दुधात कमी कीटकनाशके आढळून आल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र दोन्ही महिलांमध्ये कीटकनाशके आढळून आली.

अभ्यासानुसार, ज्या महिला मांसाहारापासून दूर राहतात त्यांच्या आईच्या दुधात कमी कीटकनाशके आढळून आली आहेत. रासायनिक शेती हे दुधात कीटकनाशकांचे कारण असल्याचेही संशोधनात म्हटले आहे. वास्तविक, हिरव्या भाज्या किंवा सर्व पिके वाढवण्यासाठी विविध प्रकारची कीटकनाशके आणि रसायने वापरली जातात. प्राण्यांना सप्लिमेंट्स आणि केमिकल्सची इंजेक्शन्सही दिली जातात, त्यामुळे मांसाहार करणाऱ्या महिलांच्या आईच्या दुधात कीटकनाशके तयार होतात.

मांसाहारी महिलांच्या दुधात कीटकनाशकांचे प्रमाण शाकाहारी महिलांच्या दुधापेक्षा तिप्पट होते. या संशोधनात असे म्हटले आहे की आईच्या दुधाद्वारे कीटकनाशके सहज मुलापर्यंत पोहोचू शकतात.

आईच्या दुधात असलेल्या कीटकनाशकांमुळे नवजात बालकांना गंभीर हानी पोहोचते, परिणामी त्यांचा मृत्यू होतो.

बालमृत्यूचे प्रमाण वाढण्याची कारणे शोधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य विकास अधिकारी (CDO) यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय समिती स्थापन केली आहे.

Leave a Comment